सचिनचे शतकांचे शतक हुकले :(
नोव्हेंबर 25, 2011 3 प्रतिक्रिया
सचिनच्या सर्व चाहत्यांचा प्रचंड हिरमोड झालेला आहे. आजच्या दिवसाच्या तिकीटाचा वानखेडेवर विक्रमी काळाबाजार झाला होता. १०० चे तिकीट ६०० ते ७०० रूपयांपर्यंत विकले गेले होते. सर्व चाहत्यांचा उत्साह आज परमोच्च होता. आपल्या लाडक्या सचिनला ‘महविक्रमादित्य’ ही पदवी देण्यास सर्वच जण आसुसलेले होते. पण……
फक्त सहा रन्स ह्या महाविक्रमाला हव्या असताना आज सचिन वानखेडे स्टेडिअम वर ९४ धावांवर रवि रामपॉलच्या गोलंदाजीवर बाद झाला. सचिन पुन्हा एकदा ‘नर्व्हस नाइन्टी’चा शिकार झालेला दिसतोय.
आता पुन्हा वाट बघणे हेच नशिबी दिसतेय


अरे आज सकाळचा त्याचा खेळ पाहिलास का?
का उगा त्या मिडियावाल्यां ‘नर्व्हस नाइन्टी’ म्हणतोस.
उलट आज फुल फॉर्ममध्ये होता. थोडी घाई नडली बास.
अरे हो पण,
ही थोडी घाई का झाली??? माझ्या मते त्याचे कारण ‘नर्व्हस नाइन्टी’ हेच असावे.
अवांतर: त्याच्या मुलाचा, अर्जुनचा, सल्ला होता तडाखेबंद खेळण्याचा.
आवांतर :
हा हा हा.