2 प्रतिक्रिया

चेन्नै नीलम चक्रीवादळच्या विळख्यात


आज चेन्नै निलम चक्रीवादळाच्या ‘विळख्यात’ सापडले आहे. संध्याकाळी साधारण 5:30 च्या सुमारास चेन्नैच्या किनार्‍यावर ते जवळजवळ 100 किलोमीटर प्रती तास ह्या वेगाने थडकणार आहे. ह्या नीलमचा प्रवास चेन्नैच्या कड्डलूर ह्या किनार्‍यावरून आंध्र प्रदेशातल्या नेल्लूर च्या दिशेने होणार आहे.

उपग्रहाने टिपलेले हे ह्या नीलमच्या सद्य परिस्थीचे छायाचित्र

चेन्नैतल्या सर्व शाळा कॉलेजेसना तसेच सरकारी कचेर्‍यांना सुट्टी जाहिर केली आहे. खाजगी क्षेत्रातील कंपन्यांमध्ये ‘अमेरिकेतील सँडी ह्या वादळाला भारताने नीलमच्या रुपाने उत्तर देऊन, भारत अमेरिकेच्या कणभरही मागे नाही’ अशी चर्चा विनोदी अंगाने चालू होती. पण खाजगी क्षेत्रातील कंपन्यांच्या व्यवस्थापनाने मात्र हे चक्रीवादळ गंभीरतेने घेऊन, त्यांचे कर्मचारी सुखरूप घरी पोहोचावेत ह्याची काळजी घेतली आहे. (ते ‘आपापल्याच’ घरी पोहोचतील ह्याची हमी देण्याची जबाबदारी मात्र ह्या कंपन्यांनी घ्यायला नकार दिला आहे असे वृत्त आहे ;) )

ह्या चक्रीवादळाबरोबरच मुसळधार पावसाचीही शक्यता वर्तवली गेली आहे, पण त्या आधिच पावसाने दुपारभर जोरदार वार्‍याच्या साथीने थैमान घातले होते. आता जरी पाउस शांत असला तरीही तुफानी वार्‍याचा जोर कायम आहे. हे चक्रीवादळ किनार्‍यावर थडकायच्या आधिच काही ठिकाणी वृक्ष उन्मळून पडण्याच्या घटना घडू लागल्या आहेत तर विजेचा लपंडाव अपेक्षेप्रमाणे चालू आहे.

ह्या सर्व पार्श्वभूमीवर प्रशासनाची तयारी कितपत आहे, हे चक्रीवादळ झेलण्याची, हे उद्या सकाळीच कळेल.

About these ads

2 comments on “चेन्नै नीलम चक्रीवादळच्या विळख्यात

तुमचा अभिप्राय नोंदवा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदल )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदल )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदल )

Connecting to %s

Follow

Get every new post delivered to your Inbox.

Join 757 other followers

%d bloggers like this: