कॉकटेल लाउंज : बी52 (B52)


‘कॉकटेल लाउंज’ मालिकेतील आजचे कॉकटेल आहे B52 (बी52)

पार्श्वभूमी:

कॉकटेल बनवण्याचे प्रकार अनेक असतात. त्यातला एक प्रकार म्हणजे “लेयर्ड” कॉकटेल्स.
वेगवेगळ्या लिकर्स आणि लिक्युर्स त्यांच्या घनतेप्रमाणॆ एकमेकांवर ओतुन त्यांचे थर बनवायचे, मग तयार होतं लेयर्ड कॉकटेल.

विमानं बनवणारी कंपनी, बोइंगने एक जेट बॉम्बर विमान अमेरिकन लष्करासाठी बनवले होते त्याचे नाव होते B-52.
ह्या विमानाने व्हिएतनाम युद्धात फार धुमाकुळ घातला होता.

हे कॉकटेल ह्या बी 52 बॉम्बरच्या रंगांच्या कॉम्बीनेशन चे असते म्हणुन त्याला बी 52 हे नाव पडले आहे.
म्हणजे ह्या कॉकटेलच्या नावाच्या उगमाची ही एक स्टोरी आहे, अनेक स्टोरीजपैकी जी मला आवडते कारण तिसरा शुटर खरोखरीच जेट विमानाप्रमाणे आकाशात घेउन जातो 🙂

कल्हुआ: ही क़ॉफी फ्लेवर असलेली मेक्सीकन लिक्युर आहे.
बेलीज आयरीश क्रीम: ही आयरीश व्हिस्की आणि क्रीम (साय) बेस्ड लिक्युर आहे.
कॉइंत्रु: ही एक ऑरेंज लिक्युर आहे, उच्च दर्जाची ट्रिपल सेक.

प्रकार: लेयर्ड शुटर (Layered Shooter)

साहित्य:

कल्हुआ – 20 मिली
आयरिश क्रीम – 20 मिली
कॉइंत्रु – 20 मिली (ओरिजिनल दुसरा पर्याय ग्रॅंड मार्निअर – ऑरेन्ज कोन्यॅक)
डार्क रम – 5 मिली (ऑप्शनल)

ग्लास: – शॉट

सर्वप्रथम कल्हुआ शॉट ग्लास मधे ओतुन घ्या. कल्हुआची घनता सर्वात जास्त असते.  हा आपला पहिला थर.

आत एक चमचा उपडा करुन तो ग्लासच्या आतल्या कडेवर चिकटवुन त्यावरुन आयरीश क्रीम काळजीपुर्वक आणि हळुवारपणे कल्हुआवर सोडा. हा झाला दुसरा थर.

आता रहिले कॉइत्रु, ते वरच्या प्रक्रियेप्रमाणॆ  काळजीपुर्वक आणि हळुवारपणे दुसर्‍या थरावर सोडा. हा झाला शेवटचा थर.

लेयर्ड शुटर बी52 तयार आहे 🙂

फ्लेमिंग बी52 किंवा बी52 ऑन मिशन Fleming B52 or B52 on Mission)

हे एक बी52 चे वेरिएशन आहे. ह्यात वरच्या शुटर वर 5 मिली डार्क रम ओतुन त्याला काडी लावा 😉 शक्यतो बकार्डी151 घ्या, कारण तिचे हाय अल्कोहोल कंटेंट रूम टेम्परचरला पेट घेते  
मी कॅप्टन मॉर्गन डार्क रम वापरली होती, ती चमच्यात घेउन गॅसवर गरम केली होती कारण रुम टेम्परचरला ती पेट घेत नाही.


अक्चुअली माझ्याकडचा शॉट ग्लास जरा मोठा (उंच) होता त्यामुळे फ्लेम जास्त नीट नाही आली 😦 पण फ्लेमसाठी बकार्डी 151 मस्ट हा धडा शिकलो आज 🙂

2 thoughts on “कॉकटेल लाउंज : बी52 (B52)

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s