स्थळ: मेट्रो शहरातील एक गजबजलेले रेल्वे स्थानक
पात्र: 2 शहरी गिज़्मो इक्वीप्ड कूल डुड्स, गॅरी (गिरिष, Software Engg.) आणि सॅंडी (संदीप, BPO कर्मचारी), 1 भंजाळलेला खेडूत
ग़ॅरी: हे मेट व्हॉट्स अप. लॉन्ग टाइम नो सी, है किधर
सॅंडी: अरे काही नाही रे कालच ऑनसाइट वरून आलो. पकलो तीच्यायला
ग़ॅरी: (तो नेमका कशाला पकला आहे ने कळल्यामुळे आणि त्याची स्वतःची ऑनसाइट हुकली असल्यामुळे कळवळून) भोसडीच्या ऐश आहे की रे तुझी, कशाला पकला आहेस?
सॅंडी: (ओशाळून, खरेतर तो का तसे म्हणाला हे त्याचे त्यालाही कळले नव्हते तर तो काय सांगणार कप्पाळ)
काही नाही रे, कट इट, यु नो व्हॉट, मी नवीन मोबाइल आणला आहे. ऍन्ड्रॉइड बेस्ड आहे. कूल पीस मॅन. ऍन्ड्रॉइड इज इन थींग.
इथे गॅरीच्या चेहेर्यावर झपकन एक बनेल रेषा चमकून जाते. गॅरी हा हार्ड कोअर ‘ऍपल’ फॅन आहे आणि सॅंडी टेक्नॉलॉजी मधे जरा मंद आहे
ग़ॅरी: अबे ढक्कन, मला विचारायचे तरी फोन घेण्याआधी, कसलं डबडं आणलय बघू
सॅंडी: गांडो 600 $ घातले आहेत घ्यायला, डबडं काय म्हणतोस?
ग़ॅरी: अबे साले, 50 $ अजून घातले असतेस तर आयफोन आला असता की, घातलीस ना ‘आय’… खी खी खी.
सॅंडी: (भयंकर भडकून) भाडखाव, माहिती आहे तुझ्याकडे आयफोन आहे. ऍन्ड्रॉइडने बूच मारली आहे बरोबर तुझ्या ऍपलची आणि त्या जॉब्सची पण, त्याला आता ‘जॉब’ शोधावा लागणार आणि तो मिळणार नाही म्हणुन चक्क रिटायर झाला बे तो आता
(इथे खेडूत मोबाइल, गांडो, भाडखाव ह्या ओळखीच्या शब्दांबरोबर काहीतरी अगम्य भाषा एकून भंजाळून गेला आहे, तोंडाचा आ वासून तो आपाल्या दोन नायकांच्या जवळ सरकून ऐकायचा प्रयत्न करू लागला आहे.)
ग़ॅरी: घंटा बे, ऍपल इज ट्रेंड सेटर, क्या चीज बनाता है
सॅंडी: होना पण आयट्युन शिवाय खरच काय घंटाही चालत नाय… खी खी खी
ग़ॅरी: अरे पण युजर एक्सपीरीएंस कसला भारी आहे, क्वालिटी कसली भारी आहे
सॅंडी: काय चाटू काय ती क्वालिटी, युएसबी चालते कारे तुझ्या त्या खोक्यात?
ग़ॅरी: (त्याच्या आयफोनला खोका म्हटले गेल्यामुळॆ प्रचंड खवळून) तुम्ही साले सगळॆ BPO वाले एकजात हमाल आहात, टेक्नॉलॉजीचा ‘टी’ तरी कळतो कारे तुम्हाला. साला ‘गाढवाला गुळाचे चव काय’ म्हणतात ते खरे आहे,
सॅंडी: अरे माझ्या घामाचे, माझ्या खिशातले पैसे घालुन मी प्रॉडक़्ट विकत घेणार आणि ते कसे वापरायचे नाही आणि कसे वापरायचे हे मी त्या तुमच्या हेकट जॉब्सच्या मताप्रमाणे का ठरवु? गाणे टाकायचे वापर आयट्य़ुन्स, गाणे डिलीट करायचे वापर आयट्य़ुन्स. हुकलेला प्रकार तिच्यायला.
ग़ॅरी: पायरसी रोखायचा तो एक ऑफिशिअल मार्ग आहे
सॅंडी: घंटा पायरसी थांबवतयं ऍप्पल, ते स्वत:च जेलब्रेक झालं, काय घंटा उखडला? आमच्या ऍन्ड्रॉइडला असलं ब्रेक वगैरे करयची गरज नाही. जन्मजातच ‘उघडा प्लॅट्फोर्म’ आहे हा. तु मर भोसडीच्या बंद खोलीत ऍप्पल खात. आम्ही मोकळ्या हवेत रमणारी माणस.
ग़ॅरी: (बोलती बंद झाल्याने भडकुन) अरे टच स्क्रीन कसा वापरायचा हे आम्हि जगाला शिकवले
सॅंडी: (उपहासाने) आम्हि????
ग़ॅरी: अ..अ.. आम्हि म्हणजे आमच्या ऍप्पलने, स्टीव्ह जॉब्सनं
सॅंडी: पण तो आता इतिहास झाला इतिहास. मराठी माणसासारखे इतिहासात रमणे/जगणे सोडा. उगवतीकडे पहा जरा. त्या सॅमसंग ने तुमच्या त्या ऍप्पलला पाणी पाजले आहे आणि स्टीव्ह जॉब्सला पण राजीनामा द्यायला भाग पाडले. एकढच काय पण खुद्द गुगलनेही ‘मोटोरोला’ घेतली विकत.
गॅरी आयुष्यात पहिल्यांदा सॅंडीकडुन अशी हार पत्करुन त्याला दोन्ही हात जोडुन दंडवत घालतो तेवढ्यात तो बावचळलेला आणि भंजाळलेला खेडुत थोडा धीर करुन ह्या दोघांच्या जवळ येतो.
खेडुत: सायेब तुम्ही जरा शिकल्या-सवरल्यावानी दिसताया म्हुन एक इचारु का?
सॅंडी, ग़ॅरी: (गोंधळुन आणि कपाळावर आठ्या आणुन) हं…
खेडुत: तुमी ते आता मुबाइलचं काय बाय बोलत व्ह्ता नव्हं? झ्यॅट काय कळल न्हाय बगा. पर मला फकस्त एकच इचारायच हाय, हे तुमच्याकडच कोणच मुबाइलच खोक वापरल्यावर आमच्या गावाकडं शिंगलची दांडी दिसल आणि आमा गाववाल्यांना, दोस्तांना एकमेकांशी बोलता इल?
आता सॅंडी, ग़ॅरी दोघे मिळुन त्या खेडुताला साष्टांग दंडवत घालतात आणि चक्क पळ काढतात 🙂