प्रिय माधुरीस


प्रिय माधुरीस,

तु तेज़ाबमधुन आलीस, वादळासारखी, आणि 1-2-3-4 च्या तालावर सर्वांना वेड लावलसं. मला मात्र ‘कह दो के तुम हो मेरे वरना…‘ ह्या गाण्यात मांडीवर थाप मारुन अनिल कपुरला आर्ततेनं साद घालणारी तु प्रचंड भावलीस आणि चरचर काळीज कापत काळजात खोल रुतुन बसलीस. अजुनही ते गाणे आणि त्यातली तुझी ती थाप काळजात कालवाकालव करते. त्यानंतर त्याच शिनेमात लोठिया पठाणचा अड्डा उध्वस्त करुन मुन्नाबरोबर जाणारी प्रचंड धास्तावलेली, घाबरलेली मोहीनी तु साकारलीस आणि तुझ्या अभिनय क्षमतेची चुणुक दिसली.

त्यानंतर तुझे सिनेमे येत गेले आणि तु तुझ्या अभिनय आणि नृत्य क्षमतेने माझ्याच नव्हे तर तमाम चाहत्यांच्या काळजाचा तुकडा बनत गेलीस. दाक्षिणात्य ताराकांच्या दाक्षिणात्य हिन्दी उचारांनी बॉलीवुडमधे बडबड करुन सुपरस्टारपद मिळवण्याच्या मालिकेला सुरुंग लावुन तु बॉलीवुडची अनभिषिक्त साम्राज्ञी बनलीस ते केवळ तुझ्या अभिनय, नृत्य क्षमतेने आणि मधाळ हसण्याने.

अनिल कपुर ह्या तगड्या अभिनेत्याबरोबर तु अभिनयाची तितकीच तगडी टक्कर देउन तु राम – लखन, परिंदा, खेल, जिंदगी एक जुआ, बेटा ह्या सारख्या अनेक दर्जेदार चित्रपटांची मेजवानी दिलीस. प्रेम-प्रतिज्ञा, दिल बेटा, दिल तो पागल है, देवदास ह्या चित्रपटांमधुन फिल्मफेअरच्या बाहुलीला जिंकलस! तुझ्या मादकतेने घायाळ करत करत तु असंख्य गाण्यांवर उन्मादक नृत्य करत करोडो लोकांच्या दिल की धडकन बनलीस. तुझ्या ह्या गाण्यांमुळे संस्कृती रक्षकांनी अश्लील – अश्लील म्हणुन तुला आणि तुझ्या नाचाला टीकेचे लक्ष केले. मी आणि करोडो चाहत्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले आणि तुही त्या टीकेला भीक घातली नाहीस.

तुझ्या मधाळ हसण्याने, नितांत सुंदर अभिनय आणि नृत्य क्षमतेने माझ्या हृदयावर राज्य करीत असल्यामुळे तुझ्या अनेक प्रमादांकडे डोळेझाक केली. वर्दी सारखा चिल्लर सिनेमा तु केलास. दयावानसारखा चित्रपटात थिल्लर भुमिकाही केलीस. चुकुन तु संजय दत्तच्या प्रेमातही पडलीस (पण त्यातुन सावरुन तु सुखरुप बाहेरही आलीस) हे सगळे मी माफ केले. कह दो के तुम हो मेरे वरना, धक धक करने लगा, हमको आजकल है किसक इंतजार, मुझको चांद लाके दो ह्या आणि अश्या अनेक गाण्यांमधील तुझ्या अदांपुढे हे सगळे प्रमाद काहीच नाही. देवदास तर केवळ तुझ्यामुळे आणि तुझ्या लाजवाब अभिनयामुळे दर्शनिय आणि लक्षणीय झाला.

त्यानंतर अचाकन तु श्रियुत नेन्यांना आपले करुन अमेरिकेत निघुन गेलीस. त्याकाळच्या प्रथेप्रमाणे (लग्न करुन अमेरिकेत जाणे) तुही वागलीस. क़ाळजावर दगड ठेउन ‘जा मुली जा दिल्या घरी तु सुखी रहा’ असा डोळेभरला निरोप तुला दिला. अचानक तु पुन्हा आलीस आणि नच बलिये म्हणालीस. सिनेमा चालला नाही तु परत गेलीस. काळाची पावले ओळखत परत आलीस ती छोट्या पदड्यावर. पण कुठे माशी शिंकली काय माहित. तु आलीस ते तुझा अमेरिकन “अक्सेंट” घेउन. कार्यक्रम नृत्याशी निगडीत होता त्यामुळे तुझा कार्यक्रमाचा चॉइसही बरोबर होता पण अमेरिकन अक्सेंट मात्र नाही झेपला. पण तरीही तुझे अढळपद अजुन शाबुत असल्यामुळे हेही कसेबसे सहन केले.

पण आज ही बातमी ऐकली, माधुरी मुंबइला परत येणार आणि बिग बॉस मधे येणार. मग मात्र रहावले नाही.

काय झाले आहे तुला? नेन्यांशी काही भांडण – बिंडण? अग होतात भांडणे नवरा बायको मधे त्याचे एवढे काय मनावर घ्यायचे? की नेन्यांची डॉक्टरी नीट चालत नाहीयेय? उगाच परत येउन बिग बॉस सारखा थिल्लर कार्यक्रम करुन तुझे अढळपद घालवु नकोस ही कळकळीची विनंती.

तुला एक उदाहरण देतो. आपली साधना, हो तीच तीच साधना क़ट वाली. तिने जेव्हा चित्रपट संन्यास घेतला त्यानंतर ती कधीही रसिकांसमोर आली नाही. मुलाखती दिल्या पण फोटो काढु दिले नाहीत. कारण तीचे म्हणणे होते की तीची जी छबी रसिकांच्या ह्र्दयात विराजमान आहे ती कायमची तशीच रहावी, तीला तडा जाउ नये.

अजुन काय बोलु, सुज्ञास सांगणे न लगे…

तुझा,
(बातमी वाचुन कळवळुन गेलेला)

4 thoughts on “प्रिय माधुरीस

 1. पैशांसाठी वाटेल ते….
  मित्रा, जो पर्यंत छापता येतात, तो पर्यंत छापून घ्यायचे… कारण आपल्यासारखी काही रसिक मंडळी असतात जे फक्त titles मधल्या त्यांच्या नावाने सिनेमा / कार्यक्रम आवर्जून पाहतात. ज्या वेळेस त्यांच्या serials ची TRP कमी होईल, तेंव्हा त्यांना याची जाण येईल की आता आपण स्वतःला आवरले पाहिजे.

  – चंशी

  Like

 2. >> जी छबी रसिकांच्या ह्र्दयात विराजमान आहे ती कायमची तशीच रहावी, तीला तडा जाउ नये. +१
  अगदी नेमकेपणाने भावना व्यक्त केल्यात तुम्ही …
  माधुरीला डिशवॉश बारच्या जाहिरातीत पाहिल्यावर मलाही अगदी असेच वाटले होते.

  Like

 3. प्रज्ञा, अगदी बरोबर आहे तुझं. त्या डिशवॉश च्या जाहिरातीत माधुरीला बघून कसंसंच झालं.

  तुमचा लेख पटेश !! आपली dignity जपून ठेवायलाच हवी अशी किमान आपल्या आवडत्या कलाकारांकडून तरी आपली अपेक्षा असते.

  अजून काय काय बघायला मिळतं.. देव आणि ती माधुरीच जाणे !!!

  Like

 4. Mr. नेने बोलले hollywood मध्ये नाही तर नाही, पण bollywood मध्ये तरी चमकून दाखव. कदाचित mr नेने असे बोलले असतील असे वाटते. मला मनापासून वाटते कि माधुरी चे पुनरागमन नको. शेवटी प्रत्येकाला स्वताचा निर्णय घेण्याचा अधिकार आहे.. all the best!

  Like

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s