ह्या वर्षीच्या मंगलमय दिवाळीला, माझे लिखाण छापील स्वरूपात प्रकाशित होण्याचे माझे स्वप्न साकार झाले.
सामनाच्या दिवाळी अंक 2011 मधे माझा लेख प्रकाशित झाला आहे.
सामनाच्या दिवाळी अंकात ह्यावर्षी ‘भ्रष्टाचार’ ही एक मध्यवर्ती संकल्पना होती.
त्यावर एक खुसखुशीत लेख मी लिहु शकेन अशी खात्री माझे आंतर्जालावरील मित्र ‘श्रियुत श्रावण मोडक’ यांना होती.
तसे त्यांनी मला सुचवले आणि लेख लिहुन घेतला. त्यांचे आभार ह्या निमीत्तने मानतो.
लेखावर जरा ‘संपादकांची (सेंसॉरची)’ कात्री लागली आहे पण त्याने लेखाची खुमारी अजिबात गेली नाहीयेय.
कृपया लेख वाचुन आपला अभिप्राय नक्की कळवा!
तसेच माझा एक लेखक मित्र ‘प्रसाद ताम्हनकर’ ह्याचाही एक लेख ‘मराठी ब्लॉग विश्व’ ह्याच अंकात प्रकाशित झाला आहे.
विविध मराठी ब्लॉग्सची ओळख त्याने अतिशय सुंदरतेने ह्या लेखात करुन दिली आहे. त्यात त्याने माझ्या ह्या ब्लॉगचाही उहापोह केला आहे. त्याचेही ह्या निमीत्ताने आभार मानतो.
त्या लेखाच्या काही भागाचे हे छायाचित्र: