कॉकटेल लाउंज : लिंचबर्ग लेमोनेड (Lynchburg-Lemonade)


मागच्या वर्षाच्या सरत्या संध्याकाळी पान धमाका कॉकटेल टाकल्यानंतर २०१२ मधे धमाकेदार सुरूवात करायची असे ठरवले होते, पण कार्यबाहुल्यामुळे जरा व्यस्त होतो. असो, आज शुक्रवार सप्ताहअखेर, एक कॉकटेल का हक तो बनता है|

‘कॉकटेल लाउंज’ मालिकेतील आजचे कॉकटेल आहे “लिंचबर्ग लेमोनेड

पार्श्वभूमी:

लिंचबर्ग हे एक अमेरिकेतील Tennessee राज्यातील शहर आहे. ह्याच शहरात ‘जॅक डनियल्स‘ ह्या प्रख्यात बर्बन व्हिस्कीची डिस्टलरी आहे. ह्या व्हिकीमुळे आणि शहराच्या नावावरून ह्या कॉकटेलचे लिंचबर्ग लेमोनेड हे नाव पडले आहे.

ह्या कॉकटेलला खरंच एक भारी पार्श्वभूमी आहे. टोनी मेसन ( Tony Mason) ह्या एका कॉकटेल बारच्या मालकाने 1980 मधे हे कॉकटेल त्याच्या बारमधे बनवले आणि त्याचे हे नामकरण केले. त्याच्या म्हणण्यानुसार जॅन डॅनियल्स डिस्टलरीच्या एका विक्रेत्याने ह्या कॉकटेलची रेसिपी  चोरली आणि ते ड्रिंक जॅन डॅनियल्सचेच आहे असे भासवून देशभर एक प्रमोशनल कॅंपेन चालू केले. घ्या, ह्या टोनीने चक्क डिस्टलरीच्या विरूद्ध कोर्टात फिर्याद ठोकली. (च्यायला, ह्या अमेरिकेत कोणीही उठून कोणावरही फिर्यादी ठोकू शकते.)  13 मिलीयन डॉलर्स नुकसान भरपाई मागीतली. कोर्टात केस तो जिंकला पण त्याला नुकसान भरपाई मिळाली नाही. मग तो वरच्या कोर्टात गेला आणि तिथल्या जजला वाटले की ह्याला नुकसान भरपाई मिळाली पाहिजे, त्याने खालच्या कोर्टाचा निर्णय फिरवून पुन्हा नव्याने केस चालू करण्याचा आदेश दिला. पुढे काय झाले, त्याला किती डॉलर्स मिळाले हे मात्र गुलदस्त्यातच राहिले. 😉

असो, नमनाला घडाभर तेल भरपूर झाले.

प्रकार: बर्बन व्हिस्की बेस्ड कॉकटेल

साहित्य:

बर्बन व्हिस्की(जॅन डॅनियल्स) 1 औस (30 मिली)
कॉईंत्रु (दुसरा पर्याय – ट्रिपल सेक) 1 औस (30 मिली)
स्वीट अ‍ॅन्ड सार सिरप 1 औस (30 मिली)
स्प्राईट किंवा सेव्ह्न अप
बर्फ
अर्धी मोसंबी
कॉकटेल शेकर
बार स्पून

ग्लास: – कॉलिन्स किंवा हाय बॉल

कृती:

कॉकटेल शेकर 3/4 बर्फाने भरून घ्या. त्यात स्प्राइट सोडून बाकीचे सगळे सहित्य घालून व्यवस्थित शेक करून घ्या. शेकरला बाहेरून पाण्याचे थेंब आले के समजायचे, मिश्रण तयार झाले आहे. आता खाली दाखवल्याप्रमाणे कॉलीन्स ग्लास मधे अर्धा ग्लासभर बर्फ आणि मोसंबीचे काप घालून घ्या.

हे कॉकटेल करताना नविन धडा शिकलो, घरच्या फ्रिझमधला बर्फ वापरताना लिंबाचे काप किंवा मोसंबीची काप ग्लासात टाकले तर बर्फ वितळायला खुप वेळ लागतो आणि तो बर्फ लॉन्ग लास्टिंग होतो 🙂

आता शेकरमधील मिश्रण ग्लासमधे ओतून घ्या.

आता ग्लासमधे स्प्राइट टाकून ग्लास टॉप अप करा.

मनमोहक, दिलखेचक आणि चवदार लिंचबर्ग लेमोनेड तयार आहे. 🙂

2 thoughts on “कॉकटेल लाउंज : लिंचबर्ग लेमोनेड (Lynchburg-Lemonade)

 1. तुमचे शिष्यत्व कधीच पत्करले आहे…..
  ते धनुष्य-बाण वाले द्रोणाचार्य गेले…पण तुमच्या हातात नवीन द्रोण देवून गेले….
  आता इथला (सौदी मधला) मुक्काम संपला की घरी रोज कॉकटेल….बायको गेली उडत….
  एक शंका….जॅक डनियल्स…ऐवजी…Black Label….चालेल का?….मला वाटते कुठलीही Scotch…चालेल…..
  आपलाच,
  आधुनिक एकलव्य

  Like

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s