आर्थिक वैर्‍याची रात्र आली आहे का ?


आजच्या अर्थ विषयक बातम्यांनुसार जागतिक चलन बाजारात रुपयाची किंमत ढासळून प्रति डॉलरला ५४-५५ रुपयांपर्यंत पोहोचली आहे. १ जानेवारी २०११ रोजी प्रति डॉलर ४४.६७ वर असलेला रुपया आज डॉलरमागे ५४-५५ अशा किमतीवर घोटाळातो आहे.

आर्थिक महासत्तेची स्वप्ने बघणार्‍या जनतेला त्या स्वनात राहू देण्याचे कौशल्य असलेल्या अर्थ मंत्रालयाला आता त्यांचे खरे कौशल्य दाखवायची वेळ आली आहे. प्रत्येक अरिष्टामागे परकीय शक्तींचा हात आहे अशी ओरड करायची सत्ताधार्‍यांची सवय असतेच त्यात त्यांना आता युरोपियन युनियच्या आर्थिक मंदीचे आणि ग्रीसच्या आर्थिक बट्ट्याबोळाचे कोलित हातात मिळालेच आहे. पण आता स्वप्नातुन जागे होउन आर्थिक घडी नीट करायची वेळ आली आहे असे वाटते.

सध्या तरी प्रणब मुखर्जींनी दिलासा द्यायचा प्रयत्न केला आहे पण त्यांनीही ग्रीसचेच तुणतुणे वाजवले आहे. त्यामुळे अर्थमंत्रालयाला आता सजग होऊन भरीव काहीतरी करायची गरज निर्माण झाली आहे. रुपयाच्या ह्या घसरगुंडीमुळे होणार्‍या आयात निर्यात तुटीचा राक्षस आता आ वासून उभा राहिल. तसेच परकिय गुंतवणुकीचा ओघ कायम राखणेही जरूरीचे ठरेल. अन्यथा हगल्या पादल्याचे निमीत्त होउन गडगडणार्‍या शेयर बाजारातही उलथापालथ होऊन गुंतवणूकदारांचे प्रचंड नुकसान होण्याची शक्यता आहे. अर्थ मंत्रालयाला आता आर्थिक शिस्त पाळून पुढची पावले उचलावी लागतील.

पण मला वाटते तशी खरोखरच आर्थिक वैर्‍याची रात्र आली आहे का? तुम्हाला काय वाटते?

2 thoughts on “आर्थिक वैर्‍याची रात्र आली आहे का ?

  1. खरंतर मी सध्या शेअर मार्केट विषयी काही लिहीत नाही आहे गेली दिड वर्षे. पण जर पॅटर्न पाहीला तर लक्षात येईल की पुढील कमजोर फळी कुठली आहे व सावधान राहणे हे कधीपण इष्टच.
    ग्रीसच्या माथ्यावर दोष मढून काहीच हाशील नाही, आपल्या देशातून परकिय गुंतवणूक गेल्या १२ महिन्यात कमी कमी होत चाललेली आहे सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे त्यामुळे आपल्या देशातीला आर्थिक घडामोडींना युरोपला जबाबदार धरणे म्हणजे नदी आटली तर त्याचा दोष समुद्राला देण्यासारखा आहे.

    Like

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s