कॉकटेल लाउंज : वॉटर्मेलन मोहितो


‘कॉकटेल लाउंज’ मालिकेतील आजचे कॉकटेल आहे “वॉटर्मेलन मोहितो

पार्श्वभूमी:

मला मनापासून आवडणारे एक रसाळ फळ म्हणजे कलिंगड. भरपूर पाणी असलेले हे रसरशीत फळ त्याच्या लाल रंगामुळे आणी हिरव्या आवरणामुळे कापल्यावर खुपच आकर्षक दिसते. कलिंगडाचे काप, त्यातल्या बिया अलगद तोंडातल्या तोंडात वेगळ्या करून खाण्यात जी मजा आहे तेवढीच मजा कलिंगडाचा रसही पिण्यात आहे. जर हा रस मजा देऊ शकतो तर मग त्याचे कॉकटेलही बहार आणणारच असा विचार येणे सहाजिकच आहे 🙂

तर आजचे कॉकटेल आहे ‘वॉटर्मेलन मोहितो’, क्लासिक मोहितोला दिलेला कलिंगडाचा फ्लेवर.  

प्रकार व्हाइट रम आणि पुदिना बेस्ड (मोहितो)
साहित्य
व्हाइट रम २ औस (६० मिली)
मोसंबी रस किंवा लेमन स्क्वॅश १.५ औस (४५ मिली)
कलिंगडाचा रस (प्युरी) २ औस (६० मिली)
ग्रेनेडाइन १० मिली
सोडा किंवा स्पार्कलिंग वॉटर १५ मिली
पुदिना ७-८ पाने
बर्फ
मडलर
बार स्पून
ग्लास कॉलिन्स

कृती:

सर्वप्रथम कलिंगडाचे काप करून मिक्सर किंवा ब्लेंडरमधून साधारण ६० मिली होईल इतका रस काढून घ्या.  त्यानंतर कलिंगडाचे ३-४ छोटे छोटे तुकडे आणि पुदिनाची ३-४ पाने कॉलिन्स ग्लास मध्ये टाकून मडलरच्या सहाय्याने चेचून घ्या. त्याने पुदिनीच्या पानांमधले तेल (Oils) आणि कलिंगडाचा ताजा रस सुटा होऊन ते कॉकटेलला तजेलदार बनवेल.

आता ग्लासमध्ये बर्फाचे खडे टाकून घ्या. त्यात रम आणि मोसंबीचा रस किंवा लेमन स्क्वॅश टाका.

कलिंगडाच्या ताज्या रसामुळे रमला एक मस्त गुलाबी छटा येईल आणि ती तशीच गट्टम करून टाकावीशी वाटेल, पण जरा कळ सोसा. सब्र का कॉकटेल बढिया होता है| 🙂  आता त्यात कलिंगडाचा रस ओतून घ्या मस्त लाल रंग येईल आता मिश्रणाला.

त्यावर आता ग्रेनेडाईन ओता. मिश्रण एकदम लालेलाल होऊन जाईल. बार स्पून वापरून मस्त ढवळून घ्या.

थोडासा सोडा किंवा स्पार्कलिंग वॉटर टाकून ग्लास टॉप अप करा. सजावटीसाठी पुदिन्याची काही पाने व कलिंगडाचा एक काप ग्लासाच्या कडेला लावा.

चला तर, लालचुटुक वॉटर्मेलन मोहितो तयार आहे 🙂

4 thoughts on “कॉकटेल लाउंज : वॉटर्मेलन मोहितो

  1. नुसती बघूनच सॉलिड वाटत आहे तर प्रत्यक्ष चव मस्तच असेल यात वाद नाही. 😉 मराठे साहेब आपण जी कॉकटेलस् सांगितली आहेत ती करता करता प्रत्येक विकेंड धुंद होऊन जाईल. 😉

    Like

  2. टरबुजाला व्होडकाचे इंजेक्शन देऊन त्याला फ्रिझर मधे थंड करा. नंतर आवडत असल्यास वर थोडं लिंबू पिळून खायला घ्या. अफलातून टेस्ट आहे.. .

    Like

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s