‘कॉकटेल लाउंज’ मालिकेतील आजचे कॉकटेल आहे “बॉईलरमेकर (BoilerMaker)”
पार्श्वभूमी:
अगदी सुरुवातीला जेव्हा ‘फक्त चढवण्यासाठी’ पिण्याचे दिवस होते तेव्हा पेग सिस्टीम असलेल्या हॉटेलमध्ये गेल्यावर, पेगनुसार पिण्यामुळे ‘पिण्यावर’ मर्यादा यायची (खरेतर हे ‘खिशाला न परवणारे असल्यामुळे’ असे असयला हवे 😀 ). त्यावर उपाय म्हणून मी एक पद्धत माझ्यापरीने शोधून काढली होती. व्हिस्कीचा एक पेग मागवायचा आणि एक बियर मागवायची. पाणी किंवा सोडा ह्याऐवजी बियर व्हिस्कीमध्ये मिक्स करून प्यायची. ह्या एक पेग आणि एक बियर ह्या फॉर्म्युल्यामुळे काम एकदम ‘स्वस्तात मस्त’ होउन जायचे. त्यावर बियरचा आणखी एक टिन हाणला की मग तर काय एकदम इंद्रपुरीतच… रंभा उर्वशी डाव्या उजव्या बाजुला… 😉
आता साग्रसंगीत कॉकटेल्स बनवायला लागल्यावर ह्या भन्नाट कॉंबीनेशनचे काही कॉकटेल आहे का त्याचा शोध घेतला, त्याचा परिपाक म्हणजे आजचे कॉकटेल बॉईलरमेकर!
प्रकार | बियर कॉकटेल |
साहित्य | |
कॅनेडियन राय व्हिस्की (पर्याय म्हणुन दुसरी कोणतीही व्हिस्की चालेल) |
1 औस (30 मिली) |
बियर | 1 टिन |
ग्लास | बियर ग्लास आणि शॉट ग्लास |
कृती:
ह्या कॉकटेलचीची कृती अतिशय सोप्पी आहे. बियर ग्लास बिरयरने अर्धा भरून घ्या आणि शॉट ग्लास मध्ये व्हिस्की ओतून घ्या.
आता तो शॉट ग्लास अलगदपणे बियर ग्लासमध्ये सोडा. हा ग्लास खाली जाताना हलकासा ‘डुब्बुक’ असा आवाज करतो तो इतका खास असतो की शब्दात वर्णन करणे निव्वळ अशक्य…
आता उरलेली बियर ओतुन ग्लास टॉप-अप करा.
चलातर मग, पोटंट आणि थंडगार बॉइलरमेकर तयार आहे 🙂
आयला !! नाव कडक आहे, इतकी वर्षे झाली हे कॉकटेल मारतो आहे, साला आज नाव समजलं ! शॉट ग्लासची कल्पना भारी आहे, या आधी फक्त यागरमाईस्टर रेड्बुलमधे अश्याच शॉटग्लासातून घेतली होती, कडक !
LikeLike
लैच भारी लागते हे कॉकतेल. 🙂
LikeLike