ब्लॉग माझा 2012 स्पर्धा आणि माझा ब्लॉग


आज ‘कर्णोपकर्णी’ ह्या शब्दाचा अर्थ मला लागला.  🙂

सप्टेंबर मध्ये ब्लॉग माझा 2012 स्पर्धेची बातमी वाचली आणि त्यात सहभागी होण्याचे ठरवून त्यात भाग घेतला. तो  सहभाग घेताना ‘कर्म कर फळाची अपेक्षा करू नकोस’ हा कृष्णाच्या भगवतगीतेचा सार अगदी लक्षात ठेवला होता (आता माझे नावच ब्रिजेश [ब्रज  + इश] त्यामुळे हे लक्षात ठेवावेच लागत नाही 🙂  ). त्यामुळे ते विसरूनच गेलो होतो. स्पर्धेच्या फॉर्ममध्ये, ‘फक्त विजेत्यांनाच’ ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात  मेलद्वारे स्पर्धेचा निकाल कळविण्यात येईल असा एक मुद्दा दिलेला होता. पहिल्या आठवड्यात काही मेल आले नाही त्यामुळे मग फळाची अपेक्षा सोडूनच दिली होती.

पण आज माझा एक ब्लॉगर मित्र, ज्याला आम्ही प्रेमाने ‘डॉन्राव’ म्हणतो (‘ब्लॉग माझा’ चा पहिल्या वर्षीचा पारितोषिक विजेता), त्याने मला एक मेसेज पाठवून “एबीपी ब्लॉग माझा 2012 च्या स्पर्धेत तुला बक्षिस मिळाले आहे त्याबद्दल अभिनंदन” असा मेसेज पाठवला. तो पर्यंत काही मी पर्सनल मेल्स चेक केलीच नव्हती (ऑफिसमध्ये सर्व पर्सनल मेल्स बॅन्ड आहेत). त्यानंतर बर्‍याच जणांचे एसएमेस आणि फेसबुकवर मेसेज आले.

लगेच मोबाइल वरून मेल चेक केले आणि प्रसन्न जोशी यांचा हा खालील मेल आला होता.

प्रिय ब्लॉग माझा २०१२ स्पर्धक,

 सोबत यंदाच्या स्पर्धेच्या निकालाची प्रत पाठवित आहे.
 हाच निकाल एबीपी माझाच्या www.abpmajha.in या वेबसाईटवर आज संध्याकाळी उशीरा किंवा उद्या सकाळपर्यंत दिसू शकेल.
 फक्त विजेत्यांना पारितोषिक वितरणाच्या कार्यक्रमाबद्दल नंतर कळविले जाईल.
 
आपला,
 प्रसन्न जोशी,
असो. सिनिअर प्रोड्युसर-अँकर, एबीपी माझा.

हा मेल वाचल्यावर आनंदाला पारावर राहिला नाही कारण ह्या स्पेर्धेत निवडलेल्या दहा उत्तेजनार्थ ब्लॉगमध्ये माझ्या ब्लॉगचा समावेश आहे!
हे नक्कीच अभिनंदनिय तर आहेच पण त्याचबरोबर अजुन चांगले लिहीत रहाण्याची जबाबदारी वाढली आहे ह्याने जरा दडपणही आले आहे.
पण असो, हा आनंद माझ्या लाडक्या ‘लॅफ्रॉंय़’  ह्या सिंगल मॉल्ट व्हिस्कीच्या साथीने साजरा करण्यात आलेला आहे 🙂

सर्वप्रथम, ही संधी सर्व मराठी ब्लॉगर्सना उपलब्ध  करून दिल्याबद्दल एबीपी माझाचे मनापासून आभार . ह्या स्पर्धेच्या सर्व परिक्षकांचे, वेळात वेळ काढून सर्व ब्लॉग्स (जवळ जवळ दिडशे) वाचून, त्यांतून विजेते निवडण्याबद्दल आभार.

ह्या माझ्या ब्लॉगवरील सर्व वाचकांचे ह्या निमित्ताने मी आभार मानतो.  तुमच्या प्रतिसादांमुळे  आणि वाचनामुळेच लिहीण्याचा हुरुप कायम राहिला आणि काहीबाही नविन लिहीत राहिलो.  मिसळपाव.कॉम ह्या संस्थळाचे आणि तेथिल वाचकांचेही आभार, माझी लेखनकला ही तेथेच बहरली आणि तिथल्याच मित्रांच्या प्रोत्साहनाने ब्लॉग लिहायला सुरुवात केली. कोणाचेही नाव इथे घेणे हा बाकीच्यांवर अन्याय होईल इतके हितचिंतक ह्या एका वर्षाच्या लेखनप्रवासात लाभले आहेत.  त्यामुळे सर्वांचेच आभार.

पण ह्यावेळी माझ्या बायकोचे आभार न मानले तर हा तिच्यावर अन्याय असेल. तिने वेळोवेळी दिलेल्या प्रोत्साहनामुळे आणि सहकार्यामुळेच हे यश बघू शकतो आहे. त्यामुळे ह्या यशात तिचाही फार मोठा हात आहे. माझ्या लेखांचे प्रुफ रिडींग नेहमी तिच करते. (आता ह्यापुढे माझ्या लेखात काही चुका आढळल्यास दोष कुणाला द्यायचा हे तुम्हाला कळले असेलच 😉 आपला दोष दुसर्‍यांवर कसा ढकलावा हा गुण कॉरपोरेट जगात नक्कीच शिकलोय!) .

तर बायको, तुझे आभार आणि अशीच साथ तु वर्षानुवर्षे देत रहा हीच एकमेव मागणी. (फक्त ह्याच जन्मी बर कां, नाही काय आहे, मलाही तुझी काळजी आहे म्हटलं  😀 )

– आपलाच, ब्रिजेश मराठे

29 thoughts on “ब्लॉग माझा 2012 स्पर्धा आणि माझा ब्लॉग

 1. हार्दिक अभिनंदन ब्रिजेश.

  विविध विषयांवर सातत्याने अगदी सहजपणे परिणामकारक भाष्य करणारे लेखन या ब्लॉगवर आम्हा वाचकांना वाचायला मिळते.

  याखेरीज हे लेखन माझ्यासारख्या नव्याने लिहू लागलेल्या वाचकांना प्रोत्साहन देणारे आहे हे विशेष.

  त्यासाठी मनःपूर्वक आभार व यापुढील प्रवासासाठी अनेक शुभेच्छा!!

  Like

 2. अभिनंदन सोत्रीशेठ.
  चला ह्या निमित्ताने आम्ही तुमच्या ब्लॉगवर हजरी लावत आहोत आणि ‘पार्टीसठी पुण्यात येणेचे करावे’ असे आमंत्रण इथेच देत आहोत.

  – छोटा डॉन

  Like

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s