दिवाळी eअंक – 2012


सर्वप्रथम सर्वाँना

!!! शुभ दीपावली आणि दिवाळीच्या अनेकोत्तम हार्दिक शुभेच्छा !!!

दरवर्षी दिवाळीला फराळाबरोबर दिवाळी अंक वाचण्याची खुमारी काही औरच असते. सकाळी कुरकुरीत चकली बरोबर आणि खमंग चिवड्यावरोबर खुसखुशित काही वाचायला असले तरच दिवाळी खर्‍या अर्थाने साजरी झाल्याचा फील येतो. दरवर्षी छापील माध्यमातले ठरलेले दिवाळी अंक न चुकता वाचले जातात. पण सध्याच्या ऑनलाइन जमान्यात मागील काही वर्षाँपासून दिवाळीत बरेच ऑनलाइन अंक प्रकाशित होत आहेत आहेत. हे माध्यम नुसते वाचनीय न रहाता आता दृक – श्राव्य असेही असल्यामुळे बरेच ऑनलाइन दिवाळी अंक हे  दृक – श्राव्य दिवाळी अंक आहेत.

त्यांचा मागोवा घेण्यासाठी ही पोस्ट. सध्या मी ज्या काही दिवाळी अंकांना भेट दिली आहे आणि वाचले आहेत त्यांच्या लिंक्स ह्या पोस्ट मध्ये देतो आहे. जसे जसे आणखी नविन दिवाळी अंकांच्या लिंक्स मिळतील आणि वाचीन तसे तसे ह्या पोस्टला अपडेट करण्याचा मनसुबा असून तसे प्रयत्न करीन.

1. मिसळपाव

ह्या संस्थळाचा ह्या वर्षी पहिला-वहिला दिवाळी अंक प्रकाशित झाला आहे. हा अंक PDF आणि HTML ह्या दोन्ही प्रकारात सादर केला आहे.
ह्या दिवाळी अंकात अस्मादिकांचे दोन लेख प्रकाशित झाले आहेत. (इथे मी सोत्रि ह्या टोपण नावाने लिहीतो)

2. ऐसीअक्षरे

ह्याही संस्थळाचा ह्या वर्षी पहिला-वहिला दिवाळी अंक प्रकाशित झाला आहे. हा अंक HTML ह्या प्रकारात आहे.  ‘बदलती माध्यमं’ ही ह्या वर्षीची मध्यवर्ती थीम आहे ह्या अंकाची. त्या विषयावरची कुमार केतकरांची मुलाखत  हे ह्या दिवाळी अंकाचे खास आकर्षण ठरावे.
ह्या दिवाळी अंकात अस्मादिकांचा एक लेख प्रकाशित झाला आहे (इथे मी सोकाजीरावत्रिलोकेकर ह्या टोपण नावाने लिहीतो)

3. मायबोली

मायबोलीचा दिवाळी अंक ‘हितगुज दिवाळी अंकाचे’  याची प्रमुख आकर्षण म्हणजे ‘संवाद’. कलागुणांमुळे, विचारांमुळे, कार्यामुळे असामान्य उंचीवर जाऊन पोहोचलेल्या व्यक्तींशी त्यांच्या प्रवासाबद्दल केलेली मनमोकळी बातचीत म्हणजेच ‘संवाद’! या वर्षी दिलीप प्रभावळकरांशी केलेला संवाद ह्या अंकात वाचायला मिळेल. त्याचबरोबर, सचिन कुंडलकरसारखा प्रतिभावान दिग्दर्शक, लेखक समजून घ्यायची संधी मिळणार आहे. या अंकात, मनोरंजनाच्या, ज्ञानाच्या जोडीला सामाजिक आस्था आणि बांधिलकीची जाणीव ठेवून विकीश प्रकारचे लेखन वाचकांना देण्याचा या अंकात प्रयत्न केला आहे..

4. मनोगत

सुदर आणि आकर्षक रंगसंगती असलेल्या ह्या दिवाळी अंकात ह्या वर्षी प्रथमच श्राव्यसाहित्याचा स्वतंत्र विभाग समाविष्ट  केला आहे. रुचकर पाककृती, विविध पद्यप्रकार, कथा, अनुभव, अनुवाद, मुलाखत, पुस्तक-परीक्षण ह्यांनी अंक सजला आहे. मनोगताचे वैशिष्ट्य असणारी शब्दकोडी ह्या वर्षीच्या अंकातही आहेत.

5. रेषेवरची अक्षरे

वेगवेगळ्या ब्लॉग्सवर लिहीले जाणारे लेखन, केवळ ललित साहित्य ह्या प्रकारचे,  निवडकपणे वेचून उत्कृष्ट लेखांचा एक गुच्छ म्हणजे रेषेवरची अक्षरेचा दिवाळी अंक. दोन-तीनशे ब्लॉग पालथे घालून ह्या रेषेवरची अक्षरेच्या टीमने मागील चार वर्षाँची परंपरा ह्या वर्षीही कायम ठेवली आहे.

चला तर मग, सध्या एवढेच. ह्यावर समाधान मानून हे सर्व दिवाळी अंक वाचून काढा, तोपर्यंत मी आणखी अंक शोधतो आणि त्यांच्या लिंक्स इथे अपडेट करतो.

2 thoughts on “दिवाळी eअंक – 2012

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s