14 प्रतिक्रिया

कॉकटेल लाउंज : गोवन समर


‘कॉकटेल लाउंज’ मालिकेतील आजचे कॉकटेल आहे “गोवन समर

पार्श्वभूमी:

मागच्या आठवड्यात 3-4 दिवसांचा गोव्याचा दौरा करून आलो. ह्यावेळी येताना काजू फेणीच्या दोन बाटल्या आणल्या. पहिल्यांदाच काजू फेणी ट्राय केली म्हणजे चव घेतली. ह्या आधि काजू फेणीबद्दलचे माझे मत बरेचसे पूर्वग्रहदूषीत होते (त्याचे कारण दुसर्‍या लेखात). आता ते सर्व ह्या काजू फेणीच्या उत्कृष्ट चवीमुळे बदलून गेले आहे. काजूच्या गराची एक मस्त चव जिभेवर रेंगाळत ठेवणारी अफलातून (सेक्सी) चव आहे काजू फेणीला. मागे एकदा माझा मित्र नचिकेत गद्रे ह्याच्याशी काजू फेणीच्या कॉकटेलबद्दल ओझरती चर्चा झाली होती. मात्र त्यावेळी काजू फेणी चाखली नसल्याने त्या चर्चेला म्हणावा तसा रंग भरला नव्हता.

आता फेणी चाखली असल्यामुळे, तिच्या चवीप्रमाणे काय कॉकटेल करता येइल ह्याचा अंदाज आला. ही रेसिपी माझे इंप्रोवायझेशन आहे. कंप्लीट, नावासकट, माझी रेसिपी.

प्रकार काजू फेणी बेस्ड कॉकटेल
साहित्य
काजू फेणी (Cazcar Brand) 2 औस (60 मिली)
कॉइंत्रो 0.5 औस (15 मिली)
लिंबाचा रस 10 मिली
लिम्का
बर्फ
मीठ
लिंबाचा काप (सजावटीसाठी)
ग्लास कॉलिन्स किंवा हाय बॉल

कृती:

सर्वप्रथम लिंबाचा काप ग्लासाच्या कडेवर फिरवून खालच्या फोटोत दाखवल्याप्रमाणे ग्लासच्या रिमवर मीठ लावून घ्या.

आता काजू फेणी, कॉइंत्रो आणि लिंबाचा रस कॉकटेल शेकर मध्ये बर्फ घालून व्यवस्थित शेक करून घ्या. त्यानंतर ग्लामध्ये क्रश्ड आइस घालून त्यात ते मिश्रण ओतून घ्या.

आता ग्लासमध्ये लिम्का टाकून ग्लास टॉप अप करा.

लिंबाचा काप ग्लासला सजावटीसाठी लावून कॉकटेल सजवून घ्या.

अफलातून चवीचे गोवन समर कॉकटेल तयार आहे🙂

14 comments on “कॉकटेल लाउंज : गोवन समर

  1. Hey Brijesh, mast zalay lekh……vachun parat Govyala jaavasa vatatay🙂

  2. माझ्याकडे कॉइंत्रो आहे आता फेणी आणायला हवी.
    मी पूर्वी एकदा जिंजर लेमन पुदिना घालून ट्राय केली होती. धमाल चव लागते.

  3. ह्याला म्हन्तात ब्र्यिज्येश मराठे ब्याक ऑन ट्र्याक!🙂
    काजू फेणी… नुस्ते मासे खातो… आता फेणी ट्राय करावीच!🙂

  4. टोमॅटॊ ज्युस + लेमन कॉर्डीअल+ क्रश्ड आइस.. आणि सॉल्ट रिम्ड ग्लास.. ब्ल्डीमेरी पेक्षा पण जास्त छान लागते.. किंवा फक्त ऑरेंज ज्युस + सोडा+ फेणी ..🙂

  5. ब्रिजेश,
    पुण्यात आहात ना? कधी भेटायचं(म्हणजे बसायचं) ?

  6. अभिनंदन आपल्या ब्लॉगचा समावेश मराठी वेब विश्व वर करण्यात आला आहे.
    अधिक माहितीसाठी भेट द्या.

    http://www.Facebook.com/MarathiWvishv
    http://www.MWvishv.Tk
    http://www.Twitter.com/MarathiWvishv

    धन्यवाद..!!
    मराठी वेब विश्व – मराठीतील सर्व संकेतस्थळे एकाच छताखाली..
    आम्ही मराठीतील प्रत्येक संकेतस्थळावरील हालचाल आपल्या पर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो.

    टिपंणी प्रकाशित केल्याबद्दल आभारी आहोत..!!

  7. मस्तंच रे. या फेणी बद्दल अनेक (गैर)समज आहेत. ते तुझ्या पुढल्या लेखातून दूर व्हावे एवढे मागणे आहे.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदल )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदल )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदल )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदल )

Connecting to %s

%d bloggers like this: