कॉकटेल लाउंज : स्पायसी गार्सिनिया इंडीका (Spicy Garcinia Indica)


‘कॉकटेल लाउंज : ग्रीष्म लाउंजोत्सव’ मालिकेतील आजचे कॉकटेल आहे स्पायसी गार्सिनिया इंडीका (Spicy Garcinia Indica)

पार्श्वभूमी:

मागे एकदा नचिकेत गद्रेशी कॉकटेल्सवरती गप्पा मारताना कोकम सरबताचा विषय निघाला आणि त्यापासून काही कॉकटेल बनविता येईल का? असा प्रश्न उपस्थित झाला. तेव्हापासून कोकम सरबतापासून एक कॉकटेल करून बघायला पाहिजे असा किडा डोक्यात वळवळत होता. आता कॉकटेल लाउंजच्या ग्रीष्म लाउंजोत्सवचे औचित्य साधून काही प्रयोग करतना कोकमाचे सिरप दिसले आणि एकदम नचिकेत डोळ्यापुढे आला. बाकी साहित्य धुंडाळल्यावर एक झक्कास प्रयोग करायचे ठरले. प्रयोग ‘उन्नीस बीस’ यशस्वी झाला. (उन्नीस बीस का ते कृतीत कळेल) नावासकट माझे इंप्रोवायझेशन आहे. आता नाव काय द्यावे असा विचार करतना विकीपिडीयावर कोकमाचे इंग्रजी नाव दिसले आणि ते एवढे भारदस्त होते की तेच वापरायचे ठरवले.

आता त्या नावात इंडीका असल्याने ‘टाटा ब्रॅन्ड’ची आठवण होऊन तोंड कडू होईल पण हे स्पायसी कॉकटेल त्यावर लगेच उतारा ठरेल 🙂

साहित्य:

प्रकार व्हाइट रम आणि कोकम रसरबत बेस्ड कॉकटेल
व्हाइट रम १ औस (३० मिली)
कोकमाचे सरबत १ ग्लास
स्वीट आणि सार सिरप १० मिली
चाट मसाला
कोथिंबीर
लिंबाचे काप
मडलर
बर्फ
ग्लास हायबॉल ग्लास

कृती:

सर्वप्रथम हायबॉल ग्लासमध्ये कोथिंबीर आणि लिंबाचे 1-2 काप घेऊन मडलरने किंचीत मडल करून घ्या.

‘किंचीत’ हे प्रमाण महत्वाचे आहे. माझे कॉकटेल ‘उन्नीस बीस’ होण्याचे कारण म्हणजे हे मडलिंग, जरा जास्त जोरात मडल केले आणि लिंबाच्या सालीचा कडसरपणा उतरला कॉकटेलमध्ये कारण त्या लिंबाच्या सालीतले ऑईल ‘किंचीत’ प्रमाणापेक्षा जास्त बाहेर पडले.

आता मडल करून झाल्यावर त्यात रम आणि स्वीट आणि सार सिरप ओतून घ्या.

आता ग्लासात कोकम सरबत टाकून ग्लास त्याने टॉपअप करा. टॉपअप करून झाल्यावर त्यात चिमूटभर चाट मसाला टाकून बार स्पूनने हलकेच मिक्स करून घ्या.

चला तर मग, स्पायसी गार्सिनिया इंडीका तयार आहे. 🙂

2 thoughts on “कॉकटेल लाउंज : स्पायसी गार्सिनिया इंडीका (Spicy Garcinia Indica)

  1. ब्रिजेश,
    तुझे कॉकटेल बाकी झक्कास असले तरी नुसतेच दाखवतोस….. पाजणार केंव्हा आहेस? 😉 … तुझ्या सारखे फक्कड जमत नाही …. भलत्याच कॉकटेलचा जन्म होईल. 😉
    आता त्या नावात इंडीका असल्याने ‘टाटा ब्रॅन्ड’ची आठवण होऊन तोंड कडू होईल … हे मात्र काही खरे नाही बरं. इंडिका हे नाव खरं तर टाटाने चोरलंय. वनस्पती शास्त्रात, झाडांच्या ज्या प्रजातींचे मूळ भारतातले आहे त्यांना इंडिका म्हणण्याची जुनी पद्धत आहे. आता आंब्याला म्यान्जीफेरा इंडिका म्हणतात कारण मुळात आंबा अस्सल भारतीयच ना. गुलाबाच्या काही जाती अस्सल भारतीय आहेत त्यांना रोझा इंडिका म्हणतात तसाच हा गार्सेनिया इंडिका त्यामुळे उगाच टाटाच्या इंडिकाला महान बनवू नकोस, 😉
    आनंद भातखंडे.

    Like

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s