तुतारी वाजली आहे, रणशिंग फुंकले गेले आहे, आजपासून विम्बल्डन २०१३ सुरु झाले आहे. मला ह्या, साहेबाच्या देशातल्या हिरव्यागार हिरवळीच्या मैदानावर होणार्या टेनिसचे अपार कौतुक आहे. टेनीसमधल्या अमेरिकन, फ्रेंच आणि ऑस्ट्रेलियन ओपन ह्या इतर स्पर्धाचे आकर्षण जरी असले तरीही ह्या विम्बल्डनची मजा काही औरच असते. साहेबाचा ‘जेंटलमंस गेम’ असे बिरुद मिरवणारा क्रिकेट हा खेळ जेंटल,शिस्तबद्ध आणि पारंपारिक राहिला नसला तरीही टेनीस हा खेळ विम्बल्डनवर अजूनही आपली परंपरा जपून आहे, पारंपारिक पोषाखामध्ये स्टार खेळाडूंनी काही झगमगते ‘स्टारडम’ आणण्याचा प्रयत्न केला असला तरीही. त्यामुळेच अजुनही विम्बल्डनची जादू मनावर अजूनही भुरळ घालतेच आहे.
महिलांच्या एकेरी स्पर्धेत शारापोवाने अपेक्षित विजय मिळवून स्पर्धेतील रंगत वाढवली आहे.
आता नुकताच राफेल नदाल आणि स्टीव्ह डोर्सिस ह्यांच्यातला सामना संपला. स्टीव्ह डोर्सिसने सरळ तीन सेटमध्ये विजय मिळवून एका खळबळजनक विजयाची नोंद विम्बल्डन २०१३ मध्ये केली आहे.
सध्याची स्थिती
महिला एकेरी
पुरुष एकेरी
ह्यापुढे जमतील त्या मॅचेस बघून ह्या स्पर्धेचा आढावा घ्यायचा प्रयत्न असेल. तर स्टे ट्युन्ड 🙂