आजची सेमी फायनल सबिना लिझिकी विरुद्ध अग्नेझ्का रॅडवान्स्का.
दमदार सुरुवात आणि लिझिकीचा मॅचमध्ये मैदानावर दमदार वावर आणि पहिल्यासेट मध्ये ब्रेकपॉइंट मिळवून आघाडी. ह्या सामन्यात सेमीफायनची चुरस आणि थरार अनुभवायला मिळतो आहे. नुकताच पहिला सेट 6-4 असा जिंकून लिझीकीने विजायाकडे कूच केली आहे. दुसर्या सेटमध्ये पहिल्याच गेमवर ब्रेक पॉइंट मिळवून एका धडाकेबाज खेळाचा अनुभव दर्शकांना मिळत आहे.
लिझिकी एका जलद लयीत वेगवान खेळ करत मैदानावर हुकुमत गाजवत आहे. सकाळी मार्टिना नवरातिलोव्हाने लिझिकीबद्दल बोलताना तिच्या खेळात वैविध्य आहे ह्याचा जाणीवपूर्वक उल्लेख केला होता. स्टेफीनंतरची पहिलीच जर्मन खेळडू विम्बल्डनवर यशाची मोहोर उठवू शकेल का?
कळेलच हा सामना संपला की 🙂
दुसर्या सामन्यात रॅडवान्स्काने पहिला गेम गमावल्यानंतर जोरदार आणि चुका टाळत,दुसरा सेट जिंकत सामन्याचे पारडे स्वत:च्या बाजूने 6-2 असे झुकवले आहे. ह्या सामन्यात आक्रमक खेळण्याच्या नादात लिझिकीने भरपूर चुका करून सामन्यावरची पकड गमावली आहे.
व्हॉट अ मॅच! व्हॉट अ मॅच!! व्हॉट अ मॅच!!!
जबरदस्त, थरारक, क्षणाक्षणाला वर-खाली वर-खाली होणारी मॅच!
शेवटी लिझिकीने ६-४, २-६ आणि ९-७ अशी जिंकली. तिसरा सेट अविस्मरणिय झाला होता. निव्वळ लाजबाब!
सामन्यानंतरची लिझीकीची मुलाखत पाहतानाही मजा आली. स्टेफी ग्राफने तिला सामन्याआधी SMS करून शुभेच्छा दिल्या होत्या म्हणे. आता फायनलही अशीच थरारक होइल अशी आशा आहे, आक्रमक खेळ करणारी लिझिकी फायनलमध्ये असल्याने.