‘कॉकटेल लाउंज मालिकेतील आजचे कॉकटेल आहे क्रॅबी कॉकटेल (Crabbie Cocktail)
पार्श्वभूमी:
Crabby ह्या शब्दाचा Crabbie अपभ्रंश करून, मात्र त्याचा अर्थ तोच घेऊन, हे कॉकटेल बनले आहे. खरेतर मी घरी उपलब्ध असलेल्या सामग्रीतून Mixology मधला काहीतरी प्रयोग करायला गेलो आणि त्या प्रयोगाचे कॉकटेल ऑलरेडी अस्तित्वात होते हे आंजावर शोध घेता कळले, तेच हे क्रॅबी कॉकटेल.
मालिबू रम हा ह्या कॉकटेलचा आत्मा आहे. मालिबू रमचे अंग म्हणजे ‘एक मखमली’ टेक्स्चर आणि चवही तितकीच भन्नाट! तिचे अननसाच्या रसाबरोबर जुळणारे सूत हे कॉकटेला एक वेगळीच ‘उंची’ देऊन जाते.
प्रकार | व्हाइट रम आणि मालिबू बेस्ड कॉकटेल |
साहित्य | |
व्हाइट रम | १ औस (३० मिली) |
मालिबू | २ औस (६० मिली) |
संत्र्याचा रस | १ औस (३० मिली) | अननसाचा रस | १ औस (३० मिली) |
बर्फ | |
ग्लास | मॉकटेल ग्लास |
कृती:
कॉकटेल शेकरमध्ये बर्फ भरून घ्या. त्यानंतर त्यात अनुक्रमे व्हाइट रम, संत्र्याचा रस, मालिबू आणि अननसाचा रस ओतून घ्या. सर्व घटक एकजीव होतील असे शेकर मध्ये शेक करुन घ्या. कॉकटेल शेकरवर बाहेरून बाष्प जमा झाले की कॉकटेल तयार झाले असे समजावे. शेक केलेले मिश्रण मॉकटेल ग्लासमध्ये ओतून घ्या.
झक्कास आणि क्रॅबी चवीचे ‘क्रॅबी कॉकटेल’ तयार आहे 🙂
आज सरत्या वर्षाच्या अखेरीस मस्त, बनवायला सहज सोप्पे कॉकटेल सांगितलेस …… आभारी आहे. ३१ ला प्रयत्न करून बघायला काहीच हरकत नाही. 😉
LikeLike
ईयर एन्ड पेश्शल मंगळवारी येते आहे 🙂
LikeLike
अरे वा….. मग हे काय फक्त वातावरण निर्मिती साठी होते की काय???? 😀
LikeLike
Yess! 😀
LikeLike