आजच्या अर्थ विषयक बातम्यांनुसार जागतिक चलन बाजारात रुपयाची किंमत ढासळून प्रति डॉलरला ५४-५५ रुपयांपर्यंत पोहोचली आहे. १ जानेवारी २०११ रोजी प्रति डॉलर ४४.६७ वर असलेला रुपया आज डॉलरमागे ५४-५५ अशा किमतीवर घोटाळातो आहे.
आर्थिक महासत्तेची स्वप्ने बघणार्या जनतेला त्या स्वनात राहू देण्याचे कौशल्य असलेल्या अर्थ मंत्रालयाला आता त्यांचे खरे कौशल्य दाखवायची वेळ आली आहे. प्रत्येक अरिष्टामागे परकीय शक्तींचा हात आहे अशी ओरड करायची सत्ताधार्यांची सवय असतेच त्यात त्यांना आता युरोपियन युनियच्या आर्थिक मंदीचे आणि ग्रीसच्या आर्थिक बट्ट्याबोळाचे कोलित हातात मिळालेच आहे. पण आता स्वप्नातुन जागे होउन आर्थिक घडी नीट करायची वेळ आली आहे असे वाटते.
सध्या तरी प्रणब मुखर्जींनी दिलासा द्यायचा प्रयत्न केला आहे पण त्यांनीही ग्रीसचेच तुणतुणे वाजवले आहे. त्यामुळे अर्थमंत्रालयाला आता सजग होऊन भरीव काहीतरी करायची गरज निर्माण झाली आहे. रुपयाच्या ह्या घसरगुंडीमुळे होणार्या आयात निर्यात तुटीचा राक्षस आता आ वासून उभा राहिल. तसेच परकिय गुंतवणुकीचा ओघ कायम राखणेही जरूरीचे ठरेल. अन्यथा हगल्या पादल्याचे निमीत्त होउन गडगडणार्या शेयर बाजारातही उलथापालथ होऊन गुंतवणूकदारांचे प्रचंड नुकसान होण्याची शक्यता आहे. अर्थ मंत्रालयाला आता आर्थिक शिस्त पाळून पुढची पावले उचलावी लागतील.
पण मला वाटते तशी खरोखरच आर्थिक वैर्याची रात्र आली आहे का? तुम्हाला काय वाटते?