केंद्र सरकारने नुकतीच पब्लिक प्रोव्हिडंड फंड (PPF) स्कीम मधे काही बदल केल्याची घोषणा केली.
हा निर्णय छोट्या गुंतवणूंकदारांमधे उत्साह आणण्यासाठी केला आहे असे सांगण्यात आले आहे.
तर काय बदल उत्साहवर्धक बदल आहेत हे बघुयात:
1. 70,000 ही गुंतवणुकीची मर्यादा 100,000 वर नेण्यात आली आहे.
– जे लोकं ‘डेट’ मधे गुंतवणूक करतात त्यांना ‘डेट’ प्रकारातील गुंतवणुक वाढवता येईल
– जे लोकं ‘इक्वीटी’ मधेही गुंतवणूक करतात आणि पोर्ट्फोलिओ ‘डेट’ प्रकारातही डायव्हर्सीफाय आता करू ईच्छितात त्यांना ‘डेट’ प्रकारातील गुंतवणुक वाढवता येईल
2. व्याजदर 8% वरून 8.6% असा शुधारित केला आहे.
– हे व्याज चक्रवाढ व्याज असते. त्यामुळे ह्या स्कीममधील थोडीशीही दरवाढ मस्त पत्रतावा गेउन जाते
3. ह्या खात्यावर मिळणारे व्याज हे Exempt-Exempt-Exempt ह्या मॉडेलनुसार करमुक्त असणार आहे.
– नो TDS ही भावनाच किती छान वाटते नं 🙂
नक्कीच हे बदल उत्साहवर्धक आहेत.