‘मॉकटेल काउंटर (कॉकटेल लाउंज)’ मालिकेतील आजचे मॉकटेल आहे ‘बे रूज’
पार्श्वभूमी:
बे रूज हा एक फ्रेंच शब्द आहे. त्या अर्थ Red Bay. मोनिन ह्या प्रख्यात फळांचे सिरप बनवणार्या फ्रेंच कंपनीचे सिरप रिलायंस मॉल मधे शोधाशोध करताना मिळाले. हे मॉकटेल ‘ब्लॅक करंट’ ह्या फळाच्या सिरप पासून बनले आहे. त्या बाटलीवर एक कॉकटेल आणि एक मॉकटेल अशी रेसिपी असते. ही रेसीपी त्या सिरपच्या बाटलीवरच मिळाली 🙂
फारच सोपी रेसिपी आहे ही, साहित्यही एकदम लिमीटेड.
साहित्य:
मोनिन ब्लॅक करंट सिरप | १0 मिली |
क्रॅनबेरी ज्युस | २ औस (६0 मिली) |
सोडा | |
बर्फ | |
स्ट्रॉ | |
लिंबाची चकती सजावटीसाठी | |
ग्लास | मॉकटेल ग्लास |
कृती:
सर्व साहित्य (सोडा सोडून) शेकर मध्ये बर्फ टाकून व्यवस्थित शेक करून घ्या. शेकरला घाम फुटला की मॉकटेल झाले असे समजावे.
आता ग्लासच्या रीमला लिंबाचा काप लावून मॉकटेल सजवा.
लालसर रंगाचे ‘बे रूज’ तयार आहे 🙂