अखेर तो दिवस आला,विम्बल्डन २०१३ – महिला एकेरी फायनलचा!
आजच्री फायनल सबिना लिझीकी विरुद्ध मॅरिऑन बार्तोली
पहिल्या सेटमध्ये थोराड बांध्याच्या बार्तोलीने धडाकेबाज सुरुवात करुन आघाडी घेतली आहे. जोरदार टेनीसचे प्रदर्शन करीत दोघीजणी सामन्यातला थरार वाढवत आहेत आणि बार्तोलीने आक्रमक खेळ करीत पहिला सेट 6-1 असा जिंकला.
दुसर्या सामन्यातही बार्तोलीने ब्रेक पॉइंट मिळवत तिचा पॉवर गेमचा धडाका चालू ठेवला आहे. ह्या मॅचचे भवितव्य ठारलेले आहे, अगदीच एकतर्फी मॅच होण्याची लक्षणे!
लिझीकीने हा सामना बहुदा मनातूनच हरलेला दिसतो आहे. 1-3 अशा पिछाडीवरून स्वत:चाच गेम तिला डिफेंड करता येत नाहीयेय आणि तिच्या बॉडीलॅन्गवेजवरूनही ती हताश झालेली दिसते आहे. सर्व्हिस करताना तिला रडू आवरत नाहीयेय.
लिझीकीकडून आज अतिशय सुमार खेळ . 6-1, 6-4 असा हा सामना बार्तोलीने आरामात, सहज खिशात टाकला. प्राथमिक फेर्यांमधली मॅच असावी अशा तर्हेने बार्तोलीने लिझीकीचा खातमा केला. लिझीकीला गेम मध्ये शिरु द्यायची संधी कुठेही तिने दिली नाही.
आणि विम्बल्डन २०१३ – महिला एकेरी फायनलची एका सहज आणि सोप्या विजयाने सांगता झाली.