विम्बल्डन २०१३ – दिवस २

महिला एकेरीतला नुकताच संपलेला एक सामना लॉरा रॉब्सन विरुद्ध मारिया किरिलेन्को.
हा सामना लॉरा रॉब्सनने सरळ २ सेट मध्ये ६-३ आणी ६-४ असा जिंकला. मॅचमध्ये थरार किंचीत होता कारण लॉरा रॉब्सनचा पूर्ण कंट्रोल मॅचभर होता. महिला टेनीसमध्येही एस(बिनतोड सर्व्हिस)चा सढळ वापर जरा चकित करुन गेला.

लॉरा रॉब्सन मारिया किरिलेन्को
Laura maria

पुरुष एकेरीतला चालू असलेला एक सामना रिचर्ड गॅस्केट विरुद्ध मार्शल ग्रॅनोलर्स.
गॅस्केट याने पहिला सेट 6-7 सात असा गमावला असला तरीही पुढ्चे दोन सेट 6-4 आणि 7-5 असे जिंकून सामन्यावर पकड मजबूत केली आहे. आत्तच त्याने तिसरा सेट 6-4 असा जिंकून सामना खिशात टाकला आहे.

रिचर्ड गॅस्केट मार्शल ग्रॅनोलर्स

प्राथमिक फेरीतले सामने बघण्यातली मजा खेळाबरोबरच देशविदेशातल्या खेळाडूंची वेगवेगळी नावे ऐकणे आणि वाचण्यातही खुप आहे. मला तर त्यात खुपच मज्जा येते 🙂

महिला एकेरीतला अजुन एक नुकताच संपलेला सामना नादिया पेत्रोव्हा विरुद्ध क्रिस्तीना प्लिस्कोव्हा.
ह्या सामन्यात नाजूक चणीच्या क्रिस्तीना प्लिस्कोव्हाचा मल्लसदृश्य थोराड देहयष्टीच्या नादिया पेत्रोव्हापुढे काय निभाव लागणार असे वाटत असतानाच तिने पहिल्या सेट मध्ये ६-३ असा विजय मिळावून आघाडी घेतली. दोन सेटमध्ये सामना निकाली निघणार का ही उत्सुकता वाटेपर्यंत सामन्यावर ताबा मिळवून दुसरा सेट ६-२ असा जिंकून सामना खिशात घातला आणि डेव्हिड आणि गोलीयेथ ह्या गोष्टीची आठवण झाली 😉

नादिया पेत्रोव्हा क्रिस्तीना प्लिस्कोव्हा