२०१३ च्या सरत्या संध्याकाळी २०१४ ह्या नववर्षाचे स्वागत करण्यासाठी कॉकटेल लाउंज मालिकेतील आजचे कॉकटेल आहे बुलफ्रॉग (Bullfrog)
पार्श्वभूमी:
३१ डिसेंबर साजरा करण्यासाठी एक पोटंट आणि तितकेच दिलखेचक व आकर्षक असलेले हे बुलफ्रॉग नावावरून ‘बैलाचा आव आणलेली बेडकी’ असे वाटणे सहाजिक आहे; पण दिसते तसे नसते ह्या उक्तीला सार्थ करणारे हे कॉकटेल आहे, साहित्यावरून ते किती जहाल असावे ह्याची कल्पना येईल.
ह्या वर्षाची आजची शेवटची रात्र एकदम मादक होऊन येणारे इंग्रजी नववर्ष आपणा सर्वांना समृद्धीचे आणि भरभराटीचे जावो ही इश्वरचरणी प्रार्थना.
प्रकार | रेड-बुल बेस्ड कॉकटेल |
साहित्य | |
व्हाइट रम | १ औस (३० मिली) |
वोडका | १ औस (३० मिली) |
जीन | १ औस (३० मिली) |
टकीला | १ औस (३० मिली) |
ब्लु कुरास्सो | १ औस (३० मिली) |
रेड बुल | टॉप-अप करण्यासाठी |
मोसंबी रस (ऑप्शनल) | १० मिली |
बर्फ | |
ग्लास | टम्बलर किंवा मॉकटेल ग्लास |
कृती:
ग्लासमध्ये 2/3 बर्फ भरून घ्या. त्यानंतर त्यात अनुक्रमे व्हाइट रम, वोडका, जीन आणि टकीला ओतून घ्या.
आता बारस्पूनने सर्व घटक एकजीव होतील असे स्टर्र करुन घ्या. आता त्यात ब्लु कुरास्सो हळूवारपणे ओतून घ्या.
आता रेड-बुल ओतून ग्लास टॉप-अप करून घ्या.
आता सजावटीसाठी ग्लासवर लिंबाचा काप लावून घ्या.
नववर्षाच्या स्वागतासाठी जहाल आणि मादक ‘बुलफ्रॉग’ तयार आहे 🙂